सुधागड शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
कळंबोली / लढवय्या रोखठोक
कळंबोलीतील सुधागड संस्थेत
शिक्षणाची सुरवात करणारे शेकडो विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून शाळेतून बाहेर पडले मात्र या विद्यार्थ्यां सोबत नेहमीच शाळेच्या आठवणी असल्याने या आठवनींना प्रत्यक्षात उजाळा देण्यासाठी कृतज्ञता दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे .
शनिवार २९ डिसेंबर दुपारी २ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन
नवीन सुधागड शाळेत करण्यात आले आहे .
शाळेच्या जुन्या आठवणी नेहमी उराशी बाळगलेल्या माजी विद्यार्थ्यांना या मेळाव्यात पुन्हा शाळेचे ते दिवस अनुभवता येणार आहेत
सुधागड संस्थेत शिकलेल्या व या शाळेतून घडून बाहेर असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी या दिनाचे आयोजन करण्यात आले असून या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी येण्यासाठी आव्हान करण्यात आले आहे .
आपले वर्ग शिक्षक , जुने मित्र , शाळेच्या काळात बाहेर बर्फाचे गोळे , भेळ ,बोरे यांची चव चाखायला देणाऱ्यांची देखील भेट व त्यासोबात दडलेल्या जुन्या आठवणी अनुभवायला मिळणार आहेत .