आदिवासी वाड्यांवर कपडे, बिस्कीट व फळे वाटप करून केवल महाडिक यांचा वाढदिवस साजरा - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

आदिवासी वाड्यांवर कपडे, बिस्कीट व फळे वाटप करून केवल महाडिक यांचा वाढदिवस साजरा

आदिवासी वाड्यांवर कपडे, बिस्कीट व फळे वाटप करून पत्रकार केवल महाडिक यांनी साजरा केला वाढदिवस.
पनवेल : लढवय्या रोखठोक
             पत्रकार केवल महाडिक यांनी आपला २९ वा वाढदिवस सोमवारी आदिवासी वाड्यांवर कपडे , बिस्किटे व फळे वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकार मित्र असोसिएशनचे राज भंडारी, गणपत वारगडा, विजय पाटील, शशिकांत दळवी आदींसह मित्र परिवार उपस्थित होते.
              समाजकार्याची जाण उराशी बाळगून आपली समाजाप्रती असलेली तळमळ केवल यांच्या उपक्रमांमधून नेहमीच समोर येत आहे. तसाच कार्यक्रम त्यांनी आपल्या वाढदिवसाला आयोजित केला. यावेळी खारघर येथील धामोळे आदिवासी वाडी, ठाकूर वाडी याठिकाणी शाळेमधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच दोन्ही वाड्यातील गरजूंना कपडे वाटपसह बिस्कीट आणि फळांचे वाटप करण्यात आले. 

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0