सेंट.जोसेफ हायस्कूलचा दहावा वार्षिक क्रीडा दिवस उत्साहात - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

सेंट.जोसेफ हायस्कूलचा दहावा वार्षिक क्रीडा दिवस उत्साहातसेंट.जोसेफ हायस्कूलचा दहावा वार्षिक क्रीडा दिवस उत्साहात

पनवेल : मनोज भिंगार्डे
लढवय्या रोखठोक

  आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला आयुष्य बदलेल...... या नविन ध्येयाने सेंट. जोसेफ हायस्कूल,एस एस सी, नविन पनवेल या शाळेत “वार्षिक क्रीडा दिवस” आणि नाताळ सण साजरा करण्यात आला.यावेळी उरणचे सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे ओलम्पिक खेळाडू  संतोष परदेशी,व पोलीस अधिकारी
अमोल जाधव, पाडुरंग कदम,हे उपस्थित होते.
  मान्यवरांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. बोध चिन्हां चे प्रतिक  आकाशात सोडण्यात आले व विविध  पथकांची परेड  करून शालेय ध्वजाला मानवंदना देऊन  कार्यक्रमाची सुरुवात झाली . त्यानंतर क्रीडाज्योत प्रज्वलित करून विविध क्रीडास्पर्धा घेण्यात आल्या त्यात धावणे,अडथळा शर्यत,कांगारू रेस, फ्रोमल रेस,गो ग्रीन रेस आयोजन करण्यात आले होते विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व मेडल्स देवून त्या स्पर्धकांचे गौरव करण्यात आले.
   या कार्यक्रमामध्ये विशेष असे लहान मुलां मुलींनी  एरोबिक्स सारखे नृत्य सादर करून सर्वांची मने जिकुंन घेतली.तर नातळ दिवस ही दणक्यात साजरा करण्यात आला .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0