तळोजातील कारखान्यात स्फोट एकाचा होरपळून मृत्यू - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

तळोजातील कारखान्यात स्फोट एकाचा होरपळून मृत्यू

तळोजातील कारखान्यात स्फोट 
 एकाचा होरपळून मृत्यू 

लढवय्या रोखठोक / वचन गायकवाड
तळोजा . 

तळोजा  एमआयडीसी पुन्हा एकदा स्फोटाच्या घटनेने हादरली असून या घटनेत एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  
  रणजितकुमार सिंग ( ३८ ) असे मृत्यूमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे 
 तळोजातील एम. एस. आर. बायोटेक  न्युट्रीशयन प्लॉट टी ३/२  या  केमिकल कंपनीत रविवारी सकाळी  अचानक भीषण स्फोट  झाला. व त्यामुळे मोठी दुर्घटना घडली यामध्ये एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला आहे .
  या घटनेनंतर  तळोजा एमआयडीसी परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा  ऐरणीवर आला आहे.
  आज सकाळी दोन कामगार पिक्युटी घातक केमिकल  आणि पावडर  फिल्टर करत असताना अचानक स्फोट झाला.  
 आगीमध्ये रणजितकुमार सिंग वय ३८ या कामगारांची जळून जागीच मुत्यू झाला .
  तळोजा अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासात आग आटोक्यात आणली.या घटनेचा तपास तळोजा पोलिस स्टेशन चे वापोनी अजयकुमार लांडगे यांच्या    मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.    

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0