अंत्यविधीला येताय लाकडे घेऊन या !
मरणानंतर ही मरणयातना
लढवय्या रोखठोक / कळंबोली
कळंबोली शहरात असलेल्या स्मशानात सध्या प्रेत जाळण्यासाठी लाकडे उपलब्ध नाहीत त्यामुळे अंत्यविधीला येणारे नातेवाईकच लाकडे सोबत घेऊन येत असल्याचा प्रकार सध्या पहावयास मिळत आहे .
त्यांच्यावर ही वेळ महापालिकेच्या ढिम्म पणा मुळे ओढवली आहे.
मरणानंतर मृतास लागणारी चार लाकडं सध्या पनवेल महानगर पालिकेकडून पुरविण्यासाठी विलंब होत असून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे .
पनवेल महानगर पालिकेत सिडकोकडे असलेले आरोग्य सेवा हस्तांतरण झाली मात्र नियोजनाच्या अभावा मुळे अद्याप महापालिका हस्तांतरण झालेल्या सेवा पुरवण्यात मागे राहत आहेत .
पनवेल महानगर पालिकेला स्मार्ट सिटीचे पडत असलेले स्वप्न व ते पूर्ण करण्यासाठी त्यांची चालली धावाधाव पाहता स्मशानाच्या मरणयातना त्यांना दिसेनाश्या झाल्या आहेत .
कळंबोली स्मशानभूमी या ठिकाणी लाकडे पुरवणाऱ्या ठेकेदाराला महापालिकेने काम थांबविण्यास सांगितल्यानंतर याठिकाणी आता लाकडे महानगरपालिका पुरवणार आहे .
मात्र कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याने याकडे काना डोळा केला जात आहे .
हा लाकडांचा पुरवठा होईल तेव्हा होईल मात्र सध्यातरी स्मशानात अंत्यविधी साठी येताना
सोबत लाकडे देखील आणा कारण पालिका नियोजन करत आहे .