गाढेश्वर वाडीचे पालकत्व राष्ट्रवादीने स्विकारले - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

गाढेश्वर वाडीचे पालकत्व राष्ट्रवादीने स्विकारले

गाढेश्वर  वाडीचे  पालकत्व  राष्ट्रवादीने स्विकारले 
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प
आरोग्य चिकित्सा शिबिराने शुभारंभ
पनवेल/ लढवय्या रोखठोक
 माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीने पनवेल तालुक्यातील आदिवासी वाडी दत्तक घेण्याचा संकल्प केला आहे. बुधवारी एमजीएम रूग्णालयाच्या मार्फत मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.अगामी काळात या वाडीचा चेहरामोहरा बदलण्याचा निश्चिय करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे  अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या वाढदिवसाचा डामडौल न करता सामाजिक उपक्रम राबवावे त्याचबरोबर दुष्काळग्रस्तांना मदतीला हात देण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्यानुसार पक्षाचे पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी दुर्गम भागात असलेली गाढेश्वर आदिवासी वाडी दत्तक घेण्याची संकल्पना  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर मांडली. त्यानुसार सर्वांना हा उपक्रम राबविण्याचा निर्धार केला. या वाडीवर शंभरापेक्षा जास्त घरे असून जवळपास आठशेपर्यंत लोकवस्ती आहे. यात बहुतांशी कुटुंब मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांना रोजगाराच्या संधीबरोबर आरोग्याचा प्रश्न भेडसावतो. पायाभुत सुविधांचा अभावाबरोबर शासकिय योजनाचीत्यांना  फारशी माहिती नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या  गाढेश्वर आदिवासी वाडीचे पालकत्व स्विकारले आहे. बुधवारी आयोजत करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात अनेकांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. डाॅ.प्रदिप सावर्डेकर, डाॅ  साबा थाॅमस, डाॅ. शिवानी कानिटकर,डाॅ प्राजक्ता देसाई, डाॅ यश शेवाळे,डाॅ यास्मिन पटेल, यांच्यासह इतरांना वैदयकीय चिकित्सा करून सल्ला दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हा सचिव चंद्रकांत राऊत,युवक काँग्रेसचे जिल्हा सल्लागार अॅड तुषार पाटील, नामदेव पाटील, बबन पवार,अल्पसंख्याक सेलचे जाहिद सुभेदार, नितीन धोडमनी, शशिकांत पाटील, वामन हिंदोळा, एमजीचे जनसंपर्क अधिकारी एकनाथ बागुल, विक्रांत दिनकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या डाॅक्टर सेलचे पदाधिकारीउपस्थित होते. जिल्हा परिषदच्या शाळेतील विदयार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर फळ वाटप करण्यात आले.


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0