वस्त्रहरण नंतर "मेलो डोळो मारून गेलो " मालवणी रसिकांसाठी लवकरच व्यावसायिक रंगमंचावर
लढवय्या रोखठोक / कणकवली
अवघ्या महाराष्ट्रच नव्हे तर सात समुद्रा पलीकडे गाजलेले जेष्ठ लेखक गंगाराम गव्हाणकर यांचे वस्त्रहरण मालवणी नाटकाला रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले . या नाटकाची लोकप्रियता अद्याप कमी झालेली नसताना
गंगाराम गव्हाणकर यांचे अजून एक नाटक" मेलो डोळो मारून गेलो " त्याच मालवणी शैलीत रसिकांच्या भेटीला येत आहे
या नाटकात सिंधुदुर्ग मधील हौशी कलावंतांना संधी देण्यात आलेली असून त्यांना हक्कच व्यासपीठ मिळून देण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही करत असल्याचे डे प्रोडक्शन व नाटकाचे निर्माते सुधीर जाधव यांनी सांगितले .
डे आर्ट प्रोडक्शन यांच्या माध्यमातून हे नाटक रसिकांच्या भेटीला येत असून सिंधुदुर्ग कोकणातील २० कलावंतांना या नाटकात आपली छाप पडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे .
" मेलो डोळो मारून गेलो " या व्यावसायिक नाटकाची सध्या जय्यद तयारी सुरु असून नुकतीच
या नाटकाची माहिती देण्यासाठी कणकवलीत गंगाराम गव्हाणकर यांच्या सह या नाटकाचे निर्माते सुधीर जाधव व दिग्दर्शक शेखर गवस यांनी पत्रकार परिषदेत आयोजित केली होती .
वस्त्रहरण या नाटकाचे ५ हजार हुन अधिक प्रयोग हाऊसफुल्ल पार पडले आहेत त्यात आता नवीन येऊ घातलेल्या "मेलो डोळो मारून गेलो " हे नाटक देखील त्याच मालवणी ठसकेबाज अंदाजात रसिकांच्या भेटीला येत आहे .
वस्त्रहरण या नाटका प्रमाणेच हे नाटक देखील रसिकांच्या गळ्यातील ताईत बनणार असल्याचा विश्वास दिग्दर्शक शेखर गवस यांनी व्यक्त केला .