आई एकविरेच्या भेटीला पायी निघाले भाविक
खिडकाळी ते एकविरा पायी दिंडीचे आयोजन
कल्याण / लढवय्या रोखठोक
खिडकाळेश्वर मित्रमंडळ खिडकाळी व एकविरा संघ यांच्यावतीने सालाबाद प्रमाणेयंदाही सलग ९ वर्षाची परंपरा जोपासत पायी एकविरा ( कार्ला) दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे .
आयोजक संजीव ठाकूर व रवी पाटील यांच्या पुढाकाराने हा दिंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे .
आई माऊली एकविरा देवीच्या भेटीसाठी दर वर्षी प्रमाणे मोठ्या उत्साहाने ही भक्त मंडळी आईचा जयघोष करत एकविरा कार्ला याठिकाणी जवळपास ९८ किलोमीटर चे अंतर पायी गाठणार आहेत.
या खिडकाळी ते एकविरा पायी दिंडी सोहळ्यासाठी सुमारे ४०० भाविकांनी सहभाग नोंदविला असून
भाविकांनी या पालखी सोहळ्यासाठी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे .
६ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजता खिडकाळी येथील गावदेवी व वेशी मंदिरातून पूजा अभिषेक करून या पायी दिंडीला सुरवात झाली याच गावात असलेले प्रसिद्ध पांडवकालीन खिडकाळेश्वर मंदिरात पालखी भेटीसाठी थांबून पुन्हा मार्गक्रमन झाली
४ दिवस ही पालखी पायी ९ तारखेला श्रीक्षेत्र एकविरा येथे पोहचणार आहे .
या पालखीत सहभागी असणाऱ्या एकाही भाविकाला पायी प्रवास करून आई माऊलीच्या आशीर्वादाने कोणताही त्रास होत नाही अशी दृढ श्रद्धा भाविकांच्या मनात आहे .
पायी दिंडी दरम्यान आजीवली उच्च माध्यमिक शाळा , पावर हाऊस खोपोली आणि शेवटी एकविरा आशा प्रकारच्या प्रवासाचा टप्पा आहे .
ताज्या बातम्या , जाहिरातीसाठी ladhvyyarokhthok फेसबुक पेज लाईक करा व लढवय्या रोखठोक युट्युब चायनल subscrib करा .