माय लेकाला अग्निशमन जवानांमुळे जीवदान - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

माय लेकाला अग्निशमन जवानांमुळे जीवदान

माय लेकाला तळोजा अग्निशमन जवानांमुळे जीवदान

लढवय्या रोखठोक  :

 तळोजातील पडघे गाव याठिकाणी घरात अडकलेल्या माय लेकाची सुखरूप सुटका तळोजा अग्निशमन जवानांनी केली आहे , या जिगरबाज जवानांच्या कामगिरीमुळे माय लोकाची सुखरूप सुटका झाली आहे.
  तळोजातील पडघे गावात एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या गवांडे परिवारातील शौर्य बबलू गवांडे वय २ वर्ष आपल्या आई सोबत घरात असताना आईने गॅसवर भाताचा कुकर ठेऊन बाथरूम मध्ये गेली त्यावेळी चिमुकल्या शौर्य याने बाथरुमची कडी लावून घेतल्याचा भयानक प्रकार घडला त्यामुळे आईला बाहेर येता आले नाही बऱ्याच वेळ चिमुकला बाहेर रडारड करू लागला व आई आतून ओरडत होती शेगडीवर असलेला कुकर लाल बुंद झाला व त्यातून मोठ्या प्रमाणात धूर घरात पसरला शेजारच्यांना खिडकीतून आवाज ऐकू गेल्यावर तळोजा अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले जवान जवान प्रवीण चिंचोले यांनी
तिसऱ्या मजल्या पर्यंत शिडीच्या साह्याने चढून खिडकीची काच फोडून  घरात प्रवेश केला व दोघा माय लेकाची सुखरूप सुटका केली .
  थोडा उशीर झाला असता तर कुकर फुटून दुर्दैवी घटना घडू शकली असती मात्र देव बलवत्तर म्हणून हा प्रसंग गवांडे परिवरपासून टळला
 

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0