मराठा आरक्षणाच्या नियमाने दुय्यम अभियंत्यांच्या भरती प्रक्रिया राबवा - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

मराठा आरक्षणाच्या नियमाने दुय्यम अभियंत्यांच्या भरती प्रक्रिया राबवा

मराठा आरक्षणाच्या नियमाने दुय्यम अभियंत्यांच्या भरती प्रक्रिया राबवा
  मुंबई / लढवय्या रोखठोक

 
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २९१ जागांसाठी काढण्यात आलेल्या दुय्यम अभियंत्यांची सरळसेवा भरतीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे.  ३ डिसेंबर पर्यंत ही ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू असून या भरती प्रक्रियेत असणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याची उत्सुकता लागली आहे . त्यामुळे ही भरती प्रक्रिया मराठा आरक्षणाच्या नियमावलीत राबवून मराठा विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा उत्सुकता मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना लागली आहे .
  मराठ्यांना लागू झालेल्या १६% आरक्षणावर नुकताच शिक्का मोहर्तब करून अवघ्या मराठा समाजाला भविष्यात नोकरी ,शिक्षण व इतर ठिकाणी लाभ मिळून देण्यासाठी मराठा समाजाने आंदोलन करून अखेर आरक्षणाचे यश पदरात पाडून घेतले आहे . याचा पहिला लाभ आता बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या दुय्यम अभियंता   भरती प्रक्रियेतील  लाभार्थ्यांना मिळण्यासाठी राज्य  सरकार व महानगर पालिकेने लवकरात लवकर पाऊले उचलून या भरती प्रक्रियेत विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ  मिळण्याची प्रतिक्षा आहे .
   २९१ पदांसाठी दुय्यम अभियंता पदाची सरळसेवा भरती  होत असून त्यापैकी दुय्यम अभियंता ( सापत्य ) १९० जागा ,
दुय्यम अभियंता ( यांत्रिकी व विद्युत ) एकूण ९२ जागा त्याच प्रमाणे दुय्यम अभियंता ( वास्तू शास्त्रज्ञ ) ९ जागा आशा पदांवर ही भरती होत असून मुंबई महानगर पालिकेने मराठा आरक्षणाच्या नियमानुसार पुन्हा ही भरती प्रक्रिया व त्यांच्या जाहिरात प्रसिद्ध करून नियमावली सादर करण्याची मागणी केली जात आहे जेणे करून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल
  आरक्षणा प्रमाणे  भरती प्रक्रिया केल्या नंतर विध्यार्थ्यांना वया मध्ये , शिक्षण अटी व राखीव कोट्यात सूट मिळण्यास मदत होणार आहे
   बृहन्मुंबई महानगर पालिके प्रमाणे सिडको महामंडळाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेत देखील मराठा विद्यार्थ्यांना लाभ मिळण्याची उत्सुकता लागली आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0