महावितरणाच्या वीजबिलात सावळा गोंधळ वीज बिलांवरील मीटर फोटो गायब - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

महावितरणाच्या वीजबिलात सावळा गोंधळ वीज बिलांवरील मीटर फोटो गायब

महावितरणाच्या वीजबिलात सावळा गोंधळ
 वीज बिलांवरील मीटर फोटो गायब 

  लढवय्या रोखठोक / कळंबोली

    महावितरणाच्या माध्यमातून कळंबोलीसह आसपासच्या शहरांना काढण्यात येणाऱ्या वीज बिलांचा सावळा गोंधळ सुरूच असून याठिकाणी असलेले महावीतरणाचे अधिकारी व ठेकेदार यांच्यातल्या जिव्हाळयाच्या हित संबंधामुळे वीज ग्राहकांना दर महिन्याला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे .
   वीज ग्राहकांना येणाऱ्या विद्युत बिलावर अवश्यक असणारे वीज मिटरचे फोटो पुन्हा गायब झाले असून सरासरी बिल ग्राहकांच्या माथी मारण्यात आलेली आहेत .
  ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी मागे घेतलेल्या जनता दरबारात अधिकाऱ्यांना व वीज रिडींग घेणाऱ्या ठेकेदारांच्या बेशिस्त कारभारावर बोट ठेवत त्यांना ताकीत देऊन देखील सुधारणा होत नसल्याने शहरातील नागरिक
 हैराण झाले आहे .
  दर महिन्याला येणारे  वीज बिल हे ग्राहकांच्या खिशाला झळ पोहचवत असून बिलात पारदर्शकता न दाखवता लूट केली जात आहे .
  उन्हाळ्यात उन्हाळा आहे असं सांगून विज अधिक वापरली असे सांगून ग्राहकांच्या खिशातून पैसे महावितरण उकळत असून आता थंडीत विजेचा वापर कमी करून सुद्धा त्यांची लूट सुरू आहे .
  ऊर्जामंत्र्यांनी या प्रकारावर गंभीर दखल घेणे गरजेचे असून कळंबोलीत सामाजिक संस्था याबाबत ऊर्जामंत्री यांना निवेदन सादर करणार आहेत .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0