नवीमुंबई पालिकेला लाजवेल पनवेल महानगर पालिका . - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

नवीमुंबई पालिकेला लाजवेल पनवेल महानगर पालिका .

नवीमुंबई पालिकेला लाजवेल 
पनवेल महानगर पालिका .


लढवय्या रोखठोक : पनवेल

   पनवेल महानगर पालिका उदयास आल्यानंतर या महापालिकेची तुलना सध्या नवीमुंबई महानगर पालिकेसोबत केली जाऊ लागली आहे .
 सध्या स्थितीला नवीमुंबई महानगर पालिका  पनवेल महानगर पालिकेच्या  तोडीला नसली तरी भविष्यात नवीमुंबईला लाजवेल अशी पालिका पनवेलच असणार असा विश्वास पनवेलचे आयुक्त गणेश देशमुख यांनी व्यक्त केला ,मात्र पनवेल महानगर पालिकेला नवी मुंबई महानगर पालिकेच्या बरोबरीला येण्यासाठी अजून १० वर्ष वाट पाहावी लागणार आल्याचे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी पत्रकारांसोबत घेतलेल्या भेटी दरम्यान संगीतले .
   सुसज्ज रस्ते , मुबलक पाणी , मैदाने  , उद्याने , तलावांचे सुशोभीकरण , सुसज्ज मुख्यालय  , परिवहन सेवा , वैद्यकीय सुविधांसाठी सुसज्ज हॉस्पिटल अशा बऱ्याच गोष्टींचे नियोजन पनवेल महानगर पालिकेने केले आहे . याचा लाभ भविष्यात येथील रहिवासी घेणार आहेत .
   पनवेल महानगर पालिका  व नवी मुंबई महानगरपालिका सध्या जवळजवळ जरी असल्या तरी बऱ्याचदा नवीमुंबई महानगर पालिकेच्या सारखी झगमगणारी पनवेल महानगरपालिका कधी होणार ?असा सवाल पनवेल महानगर हद्दीतील नागरिक करत आहेत , मात्र यासाठी आता पर्यंत येत असलेल्या अडचणीत काही प्रमाणात दूर होण्यास सुरुवात झाली असून भविष्यात नवीमुंबईला लाजवेल अशी महापालिका पनवेल हीच असेल असा विश्वास आयुक्त गणेश देशमुख यांनी व्यक्त केला .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0