महावितरणा विरोधात मनसे आक्रमक ; विज रिडींग घेणाऱ्या ठेकेदारांची डोकेदुखी - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

महावितरणा विरोधात मनसे आक्रमक ; विज रिडींग घेणाऱ्या ठेकेदारांची डोकेदुखी

महावितरणा विरोधात मनसे आक्रमक
  विज रिडींग घेणाऱ्या ठेकेदारांची डोकेदुखी
पनवेल / लढवय्या रोखठोक

  पनवेल महानगर क्षेत्रातील काही महावितरण अधिकारी व याठिकाणी विद्युत बिलासाठी नेमलेली एजन्सी शरतील ग्राहकांना ठगबाजी करत असल्याचे वारंवार निदर्शनात येत असतानाच कामोठे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे .
  शहर अध्यक्ष रोहित दुधवडकर यांनी याबाबत महावितरण व वीज रिडींग घेणाऱ्या कामचुकारा ठेकेदारांना इशारा दिला असून यांच्या विरोधात आता खळखट्याक भूमिका हाती घेण्याचे ठरवले आहे .पनवेल खांदा येथील अधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन देण्यात आले यावेळी मनसेचे मनोज कोठारी, विशाल चौधरी, घनशाम वंजारी,भगवान कदम,भागवत सरगर,अमित ठुबे,गणेश शिंदे,बाबू कदम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
   कळंबोली , कामोठे भागात वीज ग्राहकांची सध्या पिळवणूक सुरू आहे विजबिलावरून मिटरचे फोटो जाणून बुजून गायब करत गोर गरीब जनतेची दिवसेन दिवस लूट केली जात असल्याच्या घटना मनसे च्या लक्षात आल्यानंतर आता त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे . त्याच प्रमाणे कामचुकार पणा व निष्काळजी पणा करणाऱ्या
अधिकारी व ठेकेदारांना मनसे स्टाईलने सन्मानित करण्यात येणार आहे .
   प्रामुख्याने शहरात वीज मिटरचे रिडींग घेणारे ठेकेदारच बोगस गिरी करत असून महावितरण स्वतः यांच्या साठी बदनाम होत असून देखील या ठेकेदारांनवर कारवाई का होत नाही याचे उत्तर महावितरण अधिकाऱ्यांना माहीत .
     रस्त्यावर लटकणाऱ्या विद्युत वाहिन्या या भूमिगत करण्याची देखील मागणी मनसेच्या वतीने करण्यात येत आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0