एक पाऊल माणुसकीकडे संस्थेचे माणुसकीचे दर्शन* - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

एक पाऊल माणुसकीकडे संस्थेचे माणुसकीचे दर्शन*

  *एक पाऊल माणुसकीकडे संस्थेचे माणुसकीचे दर्शन*
 
लढवय्या रोखठोक/ नवी मुंबई
"एक पाऊल माणुसकीकडे" या उपक्रमांतर्गत स्वराज्य सेवाभावी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुहास शिंदे यांनी आपल्या संस्थेच्या सर्व सभासदाना एकत्र करून परिसरातील रहिवाशांकडून दिवाळी, फराळ, कपडे, पांघरून असे साहित्य गोळा  करत हे सर्व साहित्य बस स्थानक, प्लॅट फॉर्म, गरीब वस्तीमध्ये प्रत्यक्ष जाऊन या सभासदांनी हे साहित्य त्यांना दिले. या उपक्रमातून  गरीब गरजू मुलांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचा एक छोटासा प्रयत्न या संस्थेने केला .
    दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा असे म्हणत दिवाळी साजरी सारेच करतात मात्र ज्यांना दोन वेळच अन्न नाही , अंगावर कपडे नाही अशा गरजूंना दिवाळी निमित्त जीवणाश्यक वस्तू देत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवन हीच खरी दिवाळी म्हणत संस्थेचे अध्यक्ष सुहास शिंदे यांनी अनोखी दिवाळी साजरी केली .
अशा उपक्रमामुळे सामाजिक जाणिवेची भावना आमच्या युवकांमध्ये जागृत करण्याचे काम आम्ही प्रामाणिकपणे करीत असल्याचे सुहास शिंदे यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0