आईडीबीआय बँकेचे एटीएम फोडले - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

आईडीबीआय बँकेचे एटीएम फोडले


आईडीबीआय बँकेचे एटीएम फोडले

 कळंबोली / लढवय्या रोखठोक
    कळंबोली शहरातील सुरक्षा आता वाऱ्यावर आली आहे .  कळंबोली शहरातील सेक्टर १७ येत आईडीबीआय बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडले आहे . गॅस कटर च्या साह्याने चोरट्यांनी या एटीएम मशीनला कापण्याचा प्रयत्न केला  चोरट्यांच्या हातात काही लागलेले नसून पुन्हा एकदा एटीएम सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे झळझळीत वास्तव समोर आले आहे .
  मागील काही महिन्यांपूर्वी खारघर व तळोजा याठिकाणी देखील एटीएम फोडण्याच्या घटना घडल्या असून शरतील पोलीस वारंवार पेट्रोलिंग करून देखील अशा  घटना घडतात तरी कशा असा प्रश्न आता प्रश्न उपस्थित होत आहे .
  कळंबोली आयडीबीआय बँकेच्या हलगर्जीपणा व एटीएम बाहेरील सुरक्षेचा अभाव असल्याने चोरट्याने आत गॅस कटर च्या साह्याने मशीन कापण्याचे धाडस केले आहे .
   या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल झालेला असून सीसीटीव्हिच्या माध्यमातून पुढील तपास सुरू आहे .
  वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे  शहरांची सुरक्षा वाऱ्यावर आली आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0