प्रकल्पग्रस्त ठेकेदारांवर उपासमार सहाय्यक ठेकेदार म्हणून नेमणूक करण्याची मागणी - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

प्रकल्पग्रस्त ठेकेदारांवर उपासमार सहाय्यक ठेकेदार म्हणून नेमणूक करण्याची मागणी


प्रकल्पग्रस्त ठेकेदारांवर उपासमार
सहाय्यक ठेकेदार म्हणून नेमणूक करण्याची मागणी
लढवय्या रोखठोक / पनवेल

सिडकोच्या कचरा नियोजनापासून सिडको हद्दीत कचऱ्याचे ठेके घेणारे प्रकल्पग्रस्त ठेकेदार पनवेल महानगर पालिकेच्या कामबंद आंदोलनाच्या निर्णयाने रस्त्यावर आले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे.
    महापालिकेत पूर्वी यंत्रणा नसल्याने सिडकोच्या ठेकेदारांना पालिका हद्दीतील कचरा उचलण्याची जबाबदारी देण्यात आली होती . मात्र या कामातील अनियमितता पालिकेच्या लक्षात आल्यानंतर नवीन यंत्रणा व ठेकेदारांची नेमणूक करण्यात आलेली आहे , त्यामुळे पूर्वी सिडकोमध्ये सुमारे ८ वर्ष कार्यरत असणाऱ्या ठेकेदारांच्या कारभारावर अखेरचा पूर्णविराम लागला  आहे. कचरा व्यवयस्थापन सिडकोकडून महापालिकेकडे  हस्तांतरण झाल्यानंतर महापालिका या ठेकेदाराचा विचार करेल या आशेने हे ठेकेदार पाहत असताना नुकताच महापालिकेने या ठेकेदारांना काम बंद करण्याच्या सूचना दिल्याने त्यांच्यावर आर्थिक नुकसानीचे संकट कोसळले असल्याचे बोलले जात आहे .
  सिडको सोबत कार्यरत असताना कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी या ठेकेदारांनी डंपर खरीदी केले होते आता महापालिकेच्या निर्णयाने ही त्यांचा हिरमोड झाल्या नंतर या घेतलेल्या वाहनांच्या माध्यमातून रोजगार कसा मिळणार याची चिंता यांना आता सतावू लागली आहे .
  या बाबत पालिका व स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे यांच्या सोबत संपर्क साधला असता ते या प्रकरणी बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे लवकरच या बाबत ठेकेदार आयुक्तांकडे मागणी करणार आहेत .
कोट
   (  ठेकेदारांनी महापालिकेच्या निर्णयानंतर काम बंद केले मात्र महापालिकेने आमचा विचार करून सब ठेकेदार म्हणून आमचा विचार करावा जेणेकरून पुन्हा एक जबाबदारी आम्हला मिळेल .
   संदेश गायकवाड ( ठेकेदार )

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0