घातक कचऱ्याची जाळून विल्हेवाट ; प्रदूषणाच्या धुराने परिसर दूषित . - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

घातक कचऱ्याची जाळून विल्हेवाट ; प्रदूषणाच्या धुराने परिसर दूषित .



घातक कचऱ्याची जाळून विल्हेवाट ; प्रदूषणाच्या धुराने परिसर दूषित .
लढवय्या रोखठोक ;
कळंबोली येथील मोकळ्या भूखंडावर गेल्या काही दिवसांपासून घातक रासायनिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रकार सुरू असून या बाबत कोणत्याही प्रकारे लक्ष दिलेजात नसल्याने हा प्रकार वारंवार वाढताना दिसतो अज्ञात व्यक्तीकडून मध्यरात्री कचऱ्याची साठवणूक करून हा कचरा पेटवला जात आहे . 
   कळंबोली प्रमाणे तळोजा औद्योगिक वसाहतीतील काही भागात देखील अशाच प्रकारचा कचरा पेटवला जात असून जा जाळल्या नंतर मोठ्या प्रमाणात प्रदूषणाला निमंत्रण भेटत आहे .
  कळंबोली वळवली शेजारील शिव मंदिर ( वालदेश्वर मंदिर ) समोर काल सायंकाळी अशाच प्रकारचा कचरा पेटवण्यात आला या नंतर परिसरात दूरवरून मोठ्या प्रमाणात काळ्या धुराचे लोळ दिसत होते या नंतर या भागात मोठया प्रमाणात प्रदूषण झाले होते.  सुरवातीला तळोजा औद्योगिक वसाहतीत कुठे आग लागली की काय अशी शंका उपस्थित करण्यात आली मात्र वस्तू स्थिती पाहता घटनास्थळी जुन्या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये सफेद रंगाचे केमिकल , लहान मोठे डब्बे व गोन्यांमध्ये भरलेला रायनिक कचरा जळत असल्याचे लक्षात आले या आगीची तीव्रता इतकी होती की या आगुच्या धुराने परिरात मोठ्या प्रमाणात काळोख केला होता कळंबोली फूडलॅन्ड कंपनी समोरून जाणाऱ्या उड्डाणपुलावरील ये जा करणाऱ्या वाहतूक दारांना मोठया कसरतीत  वाहने चालवावी लागत होती .
 या धुराने मळमळ होइल असा वास देखील पसरला होता कळंबोली व तळोजा अग्निशमन यंत्रणेला या बाबत माहिती नसल्याचे या वेळी कळल्या पुन्हा कळंबोली हद्दीत ही घटना घडली त्यामुळे कळंबोली अग्निशमन यंत्रणेला फोन वर तक्रार दिली मात्र अग्निशमन यंत्रणेने या बाबत गंभीर दखल घेतली नाही .
 तळोजात आशा प्रकारच्या घटना 
 देवीचापाडा याठिकानाहून जाणाऱ्या चिंद्रण , कुत्तरपाडा मार्गावर होत आहे शिवाय औद्योगिक वसाहतीत असलेल्या गावाच्या आजूबाजूला देखील काही प्रमाणात  हा प्रकार सर्रास घडत आहेत .
  जैविक कचरा हा प्रदूषण मंडळाच्या परवानगीने विल्हेवाट लावणे नियम बाह्य असल्याने याबाबत काही लोक या सर्व नियमांना बगल देत हो अज्ञात ठिकाणी जाळून त्यांची विल्हेवाट लावत असल्याचे समोर येते आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0