मोकळ्या भूखंडावर दुर्गंधीयुक्त पाणी ; पाण्याने रोगराईचे सावट - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

मोकळ्या भूखंडावर दुर्गंधीयुक्त पाणी ; पाण्याने रोगराईचे सावट

तळोजा ; प्रतिनिधी ,

तळोजा औद्योगिक वासाहतीला प्रदूषणाची लागलेली साडेसाती काही कमी होण्याचे नाव घेत नाही तर दुसरीकडे याठिकाणी होणाऱ्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे .
  या प्रदूषणाबत तळोजा एम आय डी सी व प्रदूषण नियंत्रण मंडळ एक मेकांकडे बोट करत वेळ मारून नेत असून या प्रदूषणाचा नाहक त्रास येथील ग्रामस्थांना होत आहे .
 तळोजा औद्योगिक परिसरातील प्लॉट व्ही २ याठिकाणी असलेल्या एम आय डी सी च्या मोकळ्या भूखंडावर दुर्गंधीयुक्त पाणी साचलेले असून या पाण्याला उग्र वास सुटला आहे या पाण्यात लहान अळ्या देखील लागल्या असून या भयंकर प्रकाराने परिसरात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झालेली आहे .
  याबाबत एम आय डीसी   सर्व कल्पना असताना यावर उपाय योजना करण्याचे बाजूला ठेवत प्रदूषण मंडळाचे हे काम असल्याचे एम आय डी सी ने सांगितले आहे तर आम्ही लवकरच या भागाची पाहणी करून योग्य दखल घेणार असल्याचे प्रदूषण मंडळाने सांगितले आहे 
  या भागात एम आय डी सी ने ड्रेनेज वाहिन्या व नवीन चेंबर निर्मिती केली आहे मात्र बऱ्याच ठिकाणी हे चेंबर्स लिकेज असल्याने हे पाणी रस्त्यावर येत असल्याचे प्रदूषण मंडळाने सांगितले  आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0