पनवेल तालुक्यातील शिवसैनिक फुटीच्या मार्गावर .
पद नियुक्त्या सेनेच्या अंगलटी येण्याची चिन्हे
लढवय्या रोखठोक
शैलेश चव्हाण
शिवसेना पनवेल तालुक्यातील नियुक्त्या नुकत्याच जाहीर झाल्या खऱ्या मात्र , या नियुक्त्या कट्टर शिवसैनिकांच्या जिव्हारी लागल्या आहेत पनवेल तालुका शिवसेनेसाठी तळा गाळ पासून कार्यरत असलेल्या काही होतकरू शिवसैनिकांना डावलून वशिलेबाजी करून व पैसे घेऊन या नियुक्त्या केल्याचा आरोप सध्या सुरु असून
बऱ्याच शिवसैनिकांनी जाहीर निषेध पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलून दाखवला आहे .
या नियुक्त्या कोणत्या विश्वासावर केल्या गेल्या याचे उत्तर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच देऊ शकतील मात्र या नाराज शिवसैनिकांचा सेनेला भविष्यात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आता पर्यंत निस्वार्थी भावनेने कार्यरत असणाऱ्या काही शिवसैनिकांना सेनेच्या नियुक्ती यादीतून डावलून बऱ्याच जणांचा सेनेने पाय उतार केला आहे .
याच कारणाने शिवसेनेचे बरेच खंदे शिवसैनिक शेवटचा जयमहाराष्ट्र करन्याच्या तयारीत आहेत ? याला जबाबदार कोण व या बाबत पक्ष प्रमुख कोणती भूमिका मांडतात हे पाहणे गरजेचे आहे .