शिवस्मारक फक्त कमिशनसाठीच* महाराजांच्या नावे मोफत शिक्षण द्या - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

शिवस्मारक फक्त कमिशनसाठीच* महाराजांच्या नावे मोफत शिक्षण द्या

*शिवस्मारक फक्त कमिशनसाठीच*
महाराजांच्या नावे मोफत शिक्षण द्या

लढवय्या  रोखठोक
कळंबोली /

छत्रपती  शिवाजींच्या स्मारकापेक्षा त्यांच्या नावाच्या मोफत शाळा चालवा असे मत प्राध्यापक नामदेव जाधव यांनी व्यक्त केले कळंबोलीत कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते .
  ३००० कोटी च्या शिवस्मारकाच्या उभारणीतून ४० ते ५० टक्के कसे सुटतील हेच येथील राजकीय नेत्यांना माहीत आहे त्यापेक्षा इतका महाराजांचा पुळका असेल तर त्यांच्या नावे मोफत शिक्षण पुरवण्याचे धाडस दाखवा हेच खरं शिवप्रेम असेल असे ते म्हणाले . 
 तरुणांनी उद्योग धंद्यातून राजा व्हावे राजकारन्यांच्या मागे राहून
स्वतःचे भवितव्य अंधारात घालू नये असे त्यांनी सांगितले .
 या कार्यक्रमात त्यांनी राजकीय पुढाऱ्यांपासून तरुणांना लांब राहण्याचा सल्ला दिला आहे
  पांढरे कपडे घालणारे पुढारी फक्त बटाटावडा देऊन आपली पोळी शेकून घेतात त्यांना त्यांचा नाद सोडून स्वतः उद्योग धंद्यांकडे वळलं पाहिजे असे ते म्हणाले .
  या वेळेची शरद पवार व राज ठाकरे यांच्या भेटीवर हल्ला चढवला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी शरद पवार यांची एका विमान प्रवासात घेतलेली भेट ही सर्वसामान्य जनतेला मूर्ख बनवण्याची लक्षणं असून फक्त स्टंट मारण्यासाठी ही भेट पूर्व नियोजित होती असे ही ते म्हणाले ही भेट झाली तेव्हा ठराविक चायनलचे कॅमेरे त्या ठिकाणी उपस्थित होते याला म्हणायचं तरी काय . ? एक मेकांची उनी धुनी काढणारी अचानक एकत्र येणे जनतेला
   शिवाजी महारांच्या काळात २२ वर्ष दुष्काळ असताना शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले मात्र आपले राजकीय पुढारी यांनीच देशाला दुष्काळात ढकलले असल्याचे त्यांनी संगीतले .
  शिवाजी महाराजानंतर मराठ्यांना पुढारी मिळालाच नसल्याने आज मराठी तरुणांवर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे .
  स्वतःला पाटील , देशमुख म्हणवणाऱ्यांनी स्वतःचे उद्योग कारखाने उभे करून तरुणांना नोकऱ्या देण्याचे सोडून त्यांना मोर्चे , आंदोलन यांच्या कडे ओढले जात आहे .
 
  *अण्णासाहेब पाटील महामंडळ फसवे*


   तरुणांना कर्ज वाटप करून देऊ असे सांगणारे अण्णासाहेब महामंडळाची एक ही रुपया कर्ज देण्याची पात्रता नसून नुसतं पोकळ आश्वासन दिले जात आहे
 एका तरी मराठा तरुणांना या महामंडळाच्या माध्यमातून कर्ज वाटप करून दाखवलं तर या महामंडळाच्या अध्यक्षांची मी पाठ थोपटेन असे परखड मत प्राध्यापक नामदेव जाधव यांनी कळंबोलीत आयोजित कृतन्यता मेळाव्यात बोलून दाखवले

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0