शेकाप ने चेतवला रोजगाराचा महायज्ञ - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

शेकाप ने चेतवला रोजगाराचा महायज्ञ

शेकाप ने चेतवला रोजगाराचा महायज्ञ


शेतकरी कामगार पक्षाच्या ट्रेनिंग आणि रिक्रुटमेंट सेल च्या वतीने आयोजित रोजगार मेळावा-२०१८ ला प्रचंड प्रतिसाद मिळाला.तब्बल १२ हजार बेरोजगार तरुण तरुणींनी मेळाव्यात सहभाग नोंदवला.अडीच हजार तरुणांना विविध कंपन्यांच्या वतीनेअपॉईंटमेन्ट लेटर्स,ऑफर लेटर्स देण्यात आली.तसेच मेळाव्यात नोकरी न मिळालेल्या युवकांची नोंदणी शेतकरी कामगार पक्षाच्या ट्रेनिंग आणि रिक्रुटमेंट सेल कडे होणार असल्याने भविष्यात निर्माण होणाऱ्या रोजगारांची हमी या तरुणांना मिळाली आहे.
शनिवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी पनवेल च्या कर्नाळा स्पोर्ट्स अकेडमी मध्ये साकळी १० वाजता सुप्रसिद्ध  करिअर कौन्सिलर सुहास पाटील यांच्या हस्ते रोजगार मेळाव्याचे उद्घाटन संपन्न झाले.यावेळी उरण सामाजिक संस्थेचे सुधाकर पाटील,मा आमदार विवेक पाटील,आमदार बाळाराम पाटील,माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाच्या ट्रेनिंग आणि रिक्रुटमेंट सेल च्या अध्यक्षा अनुराधा ठोकळ,माजी पंचायत समिती सभापती काशिनाथ पाटील, उरण पंचायत समिती सभापती नरेश घरत,खालापूर तालुका शेकाप  चिटणीस संतोष जंगम, प म पा विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे,प म पा जिल्हा चिटणीस गणेश कडू,पनवेल तालुका चिटणीस एकनाथ भोपी,प म पा जिल्हा सहचिटणीस आर डी घरत,माजी उपसरपंच शंकर शेठ म्हात्रे,सर्व नगरसेवक ,पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0