घाटी मराठी संघटना कोणत्याही राजकीय पक्षा सोबत नाही . - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

घाटी मराठी संघटना कोणत्याही राजकीय पक्षा सोबत नाही .

घाटी मराठी संघटना स्वतंत्र .

कुणाच्याही झेंड्याखाली काम करत नाही ;  संतोष गायकवाड

लढवय्या रोखठोक / कळंबोली

   कळंबोलीत घाट माथ्यावरील नागरिकांना एकत्र एका झेंड्याखाली आणण्यासाठी घाटी मराठी संघटनेची सुरवात झाली सुरवातीला कळंबोलीत नामवंत पुढाऱ्यांनी या संघटनेत हिरहिरीने पुढाकार घेतला मात्र सध्य स्थीतीला संघटना जिद्दीवर सुरू आहे असे ठाम मत संघटनेने मांडले आहे .
 गेल्या काही दिवसांपासून ही संघटना राष्ट्रवादी , भाजप , व उदयनराजे यांच्या संपर्कात येत असल्याचे दिसू लागल्याने कळंबोलीत या संघटनेचे कैवारी कोण अशी चर्चा सुरू झाली याबाबत लढवय्या रोखठोक ने संघटनेचे अध्यक्ष संतोष गायकवाड यांच्यासोबत संपर्क करून त्यांचे म्हणणे जाणून घेतले असता आमची संघटना कोणत्याही पक्षात जाणार नाही असे स्पष्ट केले आहे .
  घाटी मराठी संघटनेचे गायकवाड व त्यांचे काही सहकारी शशिकांत शिंदे यांच्या घनिष्ठ मैत्रीच्या संपर्कात आल्याचे दिसून आले त्या पाठोपाठ उदयनराजे भोसले व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या  सोबत   फोटो व्हायरल झाल्या नंतर संघटनेच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले मात्र या सर्व प्रश्नांना बगल देत आम्ही केवळ घाट माथावरील  , कोकणी , मराठी मंडळी यांच्या साठी या मंडळींनी धडपड केली आहे म्हणून आम्ही त्यांच्या सोबत मैत्रीचे संबंध ठेवल्याचे संस्थेचे गायकवाड यांनी संगीतले .
  पनवेल महानगर पालिका निवडणुकीत भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी घटमाथावरील मंडळींना सर्वाधिक उमेदवारी दिल्याने आम्ही त्यांचा केव्हाही आदर करत असल्याचे त्यांनी संगीतले तर दुसरीकडे शशिकांत शिंदे हे आमच्या संघटनेचे मार्गदर्शक असल्याने आम्ही मैत्रिपोटी हे संबंध जपून आहोत हेच उदयनराजे भोसले यांच्या बाबत देखील आहे
  आमची संघटना ज्या  विचाराने उभी राहिली ते विचार आम्ही मोडीत काढणार नाही .
  कोणी जरी आमची संघटना कोणत्या  पक्षात असल्याची बतावणी करत असेल तर त्यांनी तो गैरसमज सोडावा
  वेळ पडेल तेव्हा आम्ही त्याबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगत संतोष गायकवाड यांनी संघटनेच्या विरोधात उठलेल रान  आपल्या भूमिकेने शांत केले आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0