तळोजात रासायनिक ड्रमचा स्फोट - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

तळोजात रासायनिक ड्रमचा स्फोट

तळोजात रासायनिक ड्रमचा स्फोट

लढवय्या रोखठोक

तळोजा /
तळोजा औद्योगिक परिसरातील मुंबईवेस्ट मॅनेजमेंट या कंपनीत आज सकाळी ८.३० च्या सुमारास केमिकल ड्रम फुटल्याने स्फोट झाला या मध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसून दोघे जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे .
   घातक रासायनिक कचऱ्याची विल्हेवाट लावणारी ही कंपनी असून अशाच प्रकारे केमिकल ड्रम जेसीबी द्वारे हलवत असताना जेसीबी चा फटका लागून मोठा स्फोट या ठिकाणी झाला व यामध्ये जेसीबी चालक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे .
   या स्फोटाने गंभीर हादरे आजूबाजूला असलेल्या गावांना बसले असून घरांचे पत्रे काचा फुटून नुकसान झालेले आहे .
  या बाबत पोलीस व अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना अष्टविनाक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे  .
   जोपर्यंत या घटनेचा तपास लागत नाही तो पर्यंत कंपनीचे काम काज चालू देणार नसल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0