पद नियुक्त्या संजय मोरेंना भोवल्या - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पद नियुक्त्या संजय मोरेंना भोवल्या

*पद नियुक्त्या संजय मोरेंना भोवल्या*


 लढवय्या रोखठोक /
पनवेल


   शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नंतर संपर्क प्रमुख संजय मोरे यांना हे प्रकरण चांगलंच अंगलट आल्याचे समोर आले . या नियुक्त्यानंतर संजय मोरे यांच्यावर सेनेच्या गुरुनाथ पाटील व एकनाथ म्हात्रे यांनी दाखवलेली नाराजी पाहता या नियुक्त्या वशिलेबाजीवर झाल्याचे आरोप मोरेंवर करण्यात आले होते .
 *लढवय्या रोखठोक* ने  या बाबत या नियुक्त्या सेनेच्या अंगलट येणार असल्याची बातमी प्रकाशित केल्यानंतर सेनाच्या नेत्यांमध्ये या बातमीची चर्चा सुरू झाली व अखेर सेनाभवनाच्या आदेशा नंतर संजय मोरे यांच्या कडून संपर्क प्रमुख पद काढून घेत सेनेने त्यांना मोठा धक्का दिला आहे सध्या ते लातूर चे काम पाहणार आहेत .
  रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदी आता मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना जबाबदारी दिली आहे तरी देखील सेना आता मोरेंनी नेमणूक केलेल्या नियुक्त्यांबाबत कोणती भूमिका मांडणार आहे या कडे लक्ष लागले आहे .
 # रायगड जिल्ह्यातील सेनेला अवकळा लागण्याचे नेमके कारण पक्ष प्रमुख शोधू शकले नाहीत
 या ठिकाणी सुरू असलेली घराणेशाही व आपापसतअसलेले मतभेद यामुळे सेना डबघाईला आली नुसते संपर्क प्रमुख बदलून सेना या भागात उभारी घेऊ शकते का ? याचा विचार करणे गरजेचे आहे .
  ( *जिल्हयात सेनेला अपयश का  ?* )
मागील विधान सभा निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराचे डिपॉजित जप्त होणे या सारखी गंभीरबाब  सेनेसाठी काय असू शकते जिल्हा परिषद व पंचायत समिती  निवडणुकीत सेनेला उमेदवार सापडत नाहीत  आणि ज्या ठिकाणी उमेदवार  उभे केले त्यातील एकही निवडून आले नाही  अशी परिस्थिती असताना सेना या भागात पुन्हा जिवंत होईल का ? हे कोड सुटता सुटत नाही .
    संपर्क प्रमुख पदी आदेश बांदेकर यांना महापालिका निवडणुकी काळात विश्वास ठेवत सेनेने जबादारी दिली होती त्यांनी त्यांच्यापरीने सेना बांधणीचा प्रयत्न केला मात्र    बांदेकर यांनी देखील येथील राजकारण पूढे हात टेकले .
  पनवेल शिवसेनेला अवकळा आल्याने आता दत्ता दळवी शिवसेनेच्या पनवेल मधील शिवसैनिकांची धुसफूस थांबवणार कशी या कडे लक्ष आहे . या भागात सेनेची पद गरजू व तळागाळातील संपर्क असणाऱ्यांना देऊन त्यांना प्रोसहन देणे गरजेचे आहे तरच सेना या भागात आपला भगवा फडकऊ शकतात असे मत काही होतकरू शिवसैनिक व्यक्त करताहेत .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0