कळंबोलीत विवाहित दाम्पत्याला बेदम मारहाण - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

कळंबोलीत विवाहित दाम्पत्याला बेदम मारहाण

कळंबोलीत विवाहित दाम्पत्याला बेदम मारहाण
  पोलिसाचा मुलगा असल्याची दहशत

 लढवय्या रोखठोक /

  कळंबोलीत  विवाहित दाम्पत्याला
  दुचाकीवरून फिरणाऱ्या युवकाने बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे .
कळंबोली डीमार्ट या ठिकाणी रामनरेश चौधरी आपल्या पत्नी सह खरेदीसाठी आले असता एका  दुचाकी स्वराने विनाकारण चौधरी दाम्पत्याला वाद घालून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे . मी पोलिसाचा मुलगा असल्याचे मारहाण करणाऱ्या युवकांच्या तोंडून येत होते रामनरेश चौधरी यांच्या सह त्यांच्या पत्नीला ही बेदम मारहाण सूरु असताना डिमार्ट येथील रिक्षा चालक धावून गेले व या तरुणांना धडा शिकवला मात्र यात जीवन भोईर या रिक्षा चालकाला या दाम्पत्याला वाचवायला गेल्याने
 दुचाकी स्वराने याच्या नाकावर हेल्मेटचा फटका मारून त्याला ही जखमी केले आहे . ज्या ठिकाणी मारहाण झाली त्या ठिकाणी पोलीस चौकी आहे मात्र त्या ठिकाणी गस्ती साठी असणारे पोलिस त्यावेळी उपस्थित नसल्याने मदती साठी कळंबोली पोलीस ठाणे गाठावे लागले  .
  हे प्रकरण  कळंबोली पोलीस ठाण्यात गेल्या नंतर उफाळे नावाच्या पिता पुत्रांवर ३२३ अंतर्गत अदाखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .
  पोलीस ठाण्याबाहेर देखील पिता पुत्रांनी मदतीसाठी आलेल्या रिक्षा चालकांना दम देत आपली दहशद निर्माण केली होती .
  पोलिसांनी याबाबत लवकरात लवकर मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करावा अन्यथा पोलीस कमिशनर यांच्याकडे तक्रार केली जाणार असल्याची मागणी पीडित दाम्पत्यांनी व डिमार्ट रिक्षा चालकांनी केली आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0