सतिष शेट्टींवर भ्रष्टाचाराचे आरोप - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

सतिष शेट्टींवर भ्रष्टाचाराचे आरोप

सतिष शेट्टी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप ;
 आमदार प्रसाद लाड यांच्या
क्रिस्टल कंपनीचा भोंगळ कारभार

लढवय्या रोखठोक .
   तळोजा सांडपाणी औद्योगिक केंद्रातील साटेलोटे व या ठिकाणी सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत
पुन्हा एकदा वाद निर्माण झालेले आहेत परिवर्तन सामाजिक संस्थेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत तळोजा सीईटीपीची पोलखोल करण्यात आली
   भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल कंपनी द्वारे लाखोंची कामे घेतली गेली असल्याचा खुलासा झाला मात्र आमच्या कंपनीला कोणत्याही प्रकारची कामे मिळाली नसल्याचे आमदार लाड यांनी सांगितले आहे त्या ठिकाणी टेंडर भरले होते मात्र आम्हला काम मिळाली नाहीत असे त्यांनी सांगितले आहे .
   सतिष शेट्टी यांचे संचालक मंडळ सीईटीपीवर आल्या नंतर मोठ्या प्रमाणात गौडबंगाल होत चाललेला असून या ठिकाणचे कारखानदार यांना या प्रकाराची कल्पना असून शेट्टी यांच्या दहशदित ते असल्याने या प्रकारची  वाछ्चता कुठे होताना दिसत नाही .
   चुकीच्या पद्धतीत लाखोंचा भ्रष्टाचार करून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही हेच दुर्दैव या भ्रष्टाचाराचा मलिदा लटण्यासाठीच की काय या प्रकाराला पाठीशी घातले जात आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0