खांदा कॉलनीत फेरीवाल्यांचे बस्तान
उद्यानाचा गेट फेरीवाल्यांनी अडवला
लढवय्या रोखठोक :
फेरीवाल्यांची डोकेदुखी संपता संपली नसून शहरात बेकायदा पद्धतीत अवैध फेरीवाल्यांनी बस्तान बांधायला सुरवात केली आहे खांदा कॉलनी परिसरात शिव मंदिर ( खांदेश्वर मंदिर )च्या मुख्य प्रवेश द्वारा बाहेरील चक्क फुटपाथ वर फेरीवाल्यांनी बस्तान थाटले असून या ठिकाणी येणाऱ्या शिवभक्तांना , जेष्ठ नागरिकरांना व फेर फटका मारायला येणाऱ्या
लहान मुलांची वाट अडवली असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत .
पनवेल चे आयुक्त सुधाकर शिंदे असताना फेरीवाल्यांवर असलेला धाक आता असल्याचे दिसत नसल्याने परिसरात जागो जागी फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे . परिसरात खांदा कॉलनी प्रमाणे , कळंबोली , कामोठे ,खारघर , तळोजा भागात देखील फेरीवाले रस्त्यावर बसू लागले असून महापालिकेच्या कामकाजावर नागरिकांनी आता नाराजी व्यक्त केली आहे .