नवीन पनवेलमधील पाणी टंचाई बाबत काँग्रेस कडून निवेदन - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

नवीन पनवेलमधील पाणी टंचाई बाबत काँग्रेस कडून निवेदन

नवीन पनवेलमधील पाणी टंचाई बाबत काँग्रेस कडून निवेदन

मंगळवार दि. १७ ऑक्टोबर २०१८ रोजी नवीन पनवेल सिडको कार्यालय येथे नवीन पनवेल शहर अध्यक्ष राहुल रमेश जानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली व पनवेल शहर महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवीन पनवेल शहरामधील पाणी टंचाई बाबत सहायक अभियंता राहुल शिरोळे सिडको यांच्याशी भेट घेवून नवीन पनवेल मधील पाणी टंचाईच्या समस्या सोडविण्याकरिता चर्चा करून से. ११, १२, १३, १८, १९ मधील समस्या निदर्शनास आणून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी व उच्च दाबाने पाणी सोडण्याकरिता मागणी केली. तसेच येणारे दसरा दिवाळी सणामध्ये पाण्याची टंचाई न भेलसावी व नवीन पनवेल मधील पाण्याच्या टाक्या तोडल्यानंतर पाण्याचा दाब कमी झाला व नागरिकांना कमी पाणी पुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी ह्या तीनही टाक्यांचे पुनर्बांधणी करून उच्च दाबाने पाणी नागरिकांना मिळवू शकते असे सहायक अभियंता यांच्या निदर्शनास आणून दिले व तसेच निवदेन सहायक अभियंता यांना देण्यात आले. या प्रसंगी महराष्ट्र प्रदेश महीला सरचिटणीस निर्मला म्हात्रे, रायगड जिल्हा युवक कॉंग्रेसचे हेमराज म्हात्रे, पनवेल विधानसभा युवक कॉंग्रेसचे अभिजित मुंडक्क्ल, मर्फी म्हसकर, जेष्ठ नेते रमेश जानोरकर, सुधीर मोरे, मनोज गांधी, शशिकला सिंग, रोहिणी खोंड, अरविंद पाटील व नवीन पनवेल अल्पसंख्याक अध्यक्ष समीर पठाण व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0